मुख्यमंत्री फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा : माजी खासदार नाना पाटोले

nana patole on cm

गडचिरोली (वृत्तसेवा) जांभुरखेड येथे सी-६० हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला असता त्यात  जवान शहीद झाले. याबाबत माजी खासदार नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

 

‘गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी लाईड्स या कंपनीने जमीन उत्खननासाठी आणलेली स्फोटकं वापरून नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवल्याचे’ पटोले यांनी म्हटले आहे. लाईड्स या कंपनीचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. याबद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितले होते, अखेर याच कंपनीतील स्फोटके वापरून नक्षलद्यांनी हा स्फोट घडवून आणला, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सुरजागड तालुक्यात राज्य सरकारने अर्धसैनिक दलाची सुरक्षा दिली आहे. आता या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

Add Comment

Protected Content