पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा मतदारसंघातील सिंचनक्षेत्र ओलीताखाली यावे व शेतकऱ्यांना उद्भवणारा पाणी प्रश्न कायमचाच मिटावा यासाठी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील ल.पा.योजना भामरखेडा ता.पारोळा हे कित्तेक दशकापासुन प्रलंबित असलेले प्रकल्प शासन दरबारी योग्य त्या पाठपुराव्याने मंजुर करून आणले. यासाठी तब्बल 30 कोटी रूपयांचा भरघोस निधी मतदारसंघासाठी मिळवुन आणला. याच्याने हजारो हेक्टर जमिन हि ओलिताखाली येवुन शेतकऱ्यांसह नागरीकांचा शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
त्यातील आज ल.पा.योजना, भामरखेडा ता.पारोळा या प्रकल्पाची पाहणी आज माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केली. या प्रकल्पामुळे पारोळा तालुक्यातील वाघरा-वाघरी, मेहु, टेहु, हनुमंतखेडे, जोगलखेडा, खोलसर, कामतवाडी, उंदीरखेडा, उडणी दिगर या गावांचा शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचाच सुटणार आहे. याप्रसंगी जोगलखेडे सरपंच अनिल पाटील, हनुमंतखेडेचे सरपंच लक्ष्मण पाटील, प्रल्हाद महाजन, उंदीरखेडेचे ग्रा.पं. सदस्य अक्षय निकम व वाघरे येथील शेतकरी बांधव व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.