Home Cities जळगाव सुषमा अंधारेंचे विभक्त पती जळगावात करणार गौप्यस्फोट !

सुषमा अंधारेंचे विभक्त पती जळगावात करणार गौप्यस्फोट !

0
58

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असून यात ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे.

सुषमा अंधारे यांचे सध्या विभक्त राहत असणारे पती वैजनाथ वाघमारे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याआधी टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी वाटचालीबाबत सूचक भाष्य केले आहे.

या संदर्भात वाघमारे म्हणाले की, सुषमा अंधारे यांना मीच घडविले आहे. मी जळगाव जिल्हा दौर्‍यावर जाणार असून तेथेच काही गौप्यस्फोट करणार आहेत. सुषमा अंधारे यांचा महाप्रबोधन यात्रेनिमित्त पार पडलेला जळगाव जिल्हा दौरा तुफान गाजला होता. या दौर्‍याने त्यांना व्यापक प्रसिध्दी मिळवून दिली होती. या पार्श्‍वभूमिवर, त्यांचे माजी पती वैजनाथ वाघमारे हे जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर पलटवार करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

तर, सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य टाळले. ते म्हणाले की, कुणालाही निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे. भावना गवळी यांचे माजी पती, गजानन किर्तीकर यांचे पुत्र हे आमच्या सोबत आहेत. यामुळे त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो असे त्या म्हणाल्या.


Protected Content

Play sound