नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लागोपाठ तब्बल नऊ वेळेस लोकसभेत निवडून गेलेले माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे आज निकाळी निधन झाले असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
माणिकराव गावित यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
१९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणार्या माणिकराव गावितांना १९८० साली कॉंग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळाली. यानंतर तब्बल नऊ वेळेस ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली होती. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले. २०१४ साली मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूरच होते. त्यांच्या माध्यमातून कॉंग्रेसचा एक निष्ठावान ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.