जळगाव संदीप होले । लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. मात्र सर्वांनाच लस मिळणार असून नागरिकांनी धीर धरावा असे आवाहन आज महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांनी केले.
आर.सी.बाफना जैन स्वाध्याय भवन येथे येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे मनपा प्रशासनावरील त्राण कमी होण्यास मदत होईल अशी भूमिका महापौर सौ. जयश्री महाजन यांनी मांडली. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्वच नागरिकांचे लसीकरण होणार आहे. परंतु, लशीचा पुरवठा कमी प्रमाणत होत असल्याने हा सर्व गोंधळ उडत आहे. हा पुरवठा वाढल्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण होणार असल्याचे आश्वासन महापौर सौ. जयश्री महाजन यांनी दिले. लसीकरण करतांना सर्वांनी शांतेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी याप्रसंगी केले. दरम्यान, मुलतानी हॉस्पिटल लसीकरण केंद्राचा आज पहिलाच दिवस असल्याने अनुभव कमी असल्याने गोंधळ उडाला असून तेथे उद्यापासून लसीकरण सुरळीत होईल अशी ग्वाही महापौर सौ. जयश्री महाजन यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/471490787491835