Home Cities बुलढाणा जिल्हा ‘अपघात शुन्य’ करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी : अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके

जिल्हा ‘अपघात शुन्य’ करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी : अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज यंत्रणेशी निगडीत काम करतांना नियमित कर्मचारी तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी स्वत; सुरक्षेची पूर्ण खबरदारी घ्यावी आणि इतरांनाही खबरदारी घेण्यास बाध्य करावे.असे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी बुलडाणा लघु प्रशिक्षण केंद्र येथे बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता ” कामावरील सुरक्षिततेबात दक्षता ” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण,उपकार्यकारी अभियंता विनोद गुबे,व्यवस्थापक पोर्णिमा कदम ,यांच्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बाह्यस्त्रोत तत्वावर कार्यरत असलेले ५६ तंत्रज्ञ आणि यंत्रज्ञचालक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सुरेंद्र कटके म्हणाले की,अपघाताचे दुष्परिणाम संपूर्ण कुटूंबाला सोसावे लागतात.वीज क्षेत्रात चुकीला माफी नाही. त्यामुळे सुरक्षा साधनाशिवाय कोणीही विनाकारण आत्मविश्वास दाखवू नये,तथापि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कामावरील धोके ओळखत स्वत: खबरदारी घ्यावी आणि इतरांनाही खबरदारी घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

या चर्चासत्रा दरम्यान ५६ बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एचडीएफसी बँकेमार्फत झिरो बॅलन्स वेतन खाते उघडून देण्यात आलेत. तसेच लहुजी ठोंबरे बँकेचे प्रतिनिधी यांच्याकडून झिरो बॅलेन्स खाते व त्यात असलेल्य सुविधा,बँकेकडून मिळणारे विविध फायदे व अपघाती विमा रक्कम सुविधा याबाबतची माहिती देण्यात आली. महावितरण मध्ये काम करतांना सुरक्षा साधने व संभाव्य धोके याबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण आणि उप कार्यकारी अभियंता विनोद गुबे यांनी आपले मार्गदर्शन केले.


Protected Content

Play sound