Home Cities बुलढाणा वाढदिवसाला प्रत्येकाने वृक्षारोपण करावे : डॉ.कालिदास थानवी

वाढदिवसाला प्रत्येकाने वृक्षारोपण करावे : डॉ.कालिदास थानवी


खामगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मागील अनेक वर्षांपासून सेवाभावी पद्धतीने मिशन ओटू या झाडे लावा झाडे जगवा या प्रेरणेने तयार झालेला एक विचार आज वृक्षारोपण जसजसे वाढत आहे .तसतसं त्याची सदस्य संख्या सोबत झाडे देखील वाढत आहे.

यामध्ये परिसरातील नागरिकाला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्याचे असते. त्याला मोफत पद्धतीने याकरता प्रोत्साहन केल्या जाते. हजारो झाडे नुसते या उपक्रमांतर्गत लावलेच नाही. तर ते जगण्याकरता देखील 365 दिवस यातील सदस्य निस्वार्थ भावने ने काम करत असतात. या अंतर्गतच मागील अनेक वर्षापासून मिशन ओटूचे सेवा सदस्य म्हणून कार्यरत असलेले अमोल सराफ यांनी त्याच्या वाढदिवशी वृक्षारोपण केले.

यावेळी जनुना येथील नगरपरिषद खामगाव व मिशन ऑक्सिजन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कालिदास थानवी, सेवक सदस्य धर्मेश नागराणी उपस्थित होते. या अशा अभिनव संकल्पनेमुळे दिवसेंदिवस या विचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत आता येथे मिशन ओटू पार्क भविष्यामध्ये कार्यान्वित होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना एक निसर्गरम्य ठिकाण अनुभवता येणार आहे.


Protected Content

Play sound