यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ऊर्दु विभागाच्या वतीने ईद मिलन व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जाकिर हुसेन ऊर्दू हायस्कूलचे एस. एम. अन्वर हे होते. याप्रसंगी उर्दूचे साहित्यकार अन्वर यांनी मानवता हाच खरा धर्म आहे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील हे होते. पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या देशातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर व राष्ट्रीय एकात्मतेवर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन खान यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले.
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. आर. गायकवाड, नरेंद्र पाटील मोरे, पावरा, मिलींद बोरागडे यांची उपस्थिती व परिश्रम लाभले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयातील उर्दू विभागातील विद्यार्थी मोठया संख्येत या कार्यक्रमास उपस्थित होते.