जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालात रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळाले.
१३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 70,525 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,61,334 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 90,809 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले असून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिताताई वाघ ह्या १,७९,०४३ मतांनी आघाडीवर असून त्यांना 86,381 मते मिळाली आहे तर करण पवार यांना 92,662 इतकी मते मिळाली. या निकालावरून महायुतीचे दोन्ही उमेदवार चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले.