रेडक्रॉस दिनानिमित्त ‘युथ रेड क्रॉस विंग’ची स्थापना

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आज (दि.८ मे) रोजी रेडक्रॉस दिनानिमित्ताने ‘युथ रेड क्रॉस विंग’ची स्थापना करण्यात आली.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्टार प्रमोद भिरूड, डॉ.उल्हास पाटील, लॉ कॉलेजचे प्राचार्य एडवोकेट सतीश घाडगे, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रेड क्रॉस गनी मेनन, सेक्रेटरी रेड क्रॉस विनोद बियाणी, जॉईंट सेक्रेटरी चेअरमन राजेश यावलकर, चेअरमन ऑफ ब्लड बँक सेंटर रेड क्रॉस डॉ. प्रसन्नकुमार तासांनी इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होती. 

आज सर्व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे शिक्षक कथा इतर कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रोफेसर विशाखा वाघ यांनी कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला रेड क्रॉसविषयी माहिती सांगितली व रेड क्रॉस सोसायटीची ओळख सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य निर्देशक, प्रा .सुमित निर्मल, प्रा.रिबेका लोंढे, प्रा. मोनाली भारसागळे, प्रा. रश्मी टेंभुर्ने , प्रा. श्वेता डहाके व सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. pandemic काळामध्ये सर्व प्रकारच्या शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम गोदावरी नर्सिंग महाविद्यालय याद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी पूर्वा उत्पल BSc Nursing Final year विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले. 

तथा रेड क्रॉस डे निमित्त ब्लड डोनेशन कॅम्पच्या सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी कर्मचारी व विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

 

Protected Content