भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी साई पुष्प कोवीड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. असे प्रतिपादन डॉ. निलेश महाजन यांनी केले आहे.
जनतेच्या सेवेसाठी साई पुष्प कोवीड सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. सेंटरची सुरुवात करताना सेवाभावी वृत्तीने सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त रुग्णांची सेवा कशी करता येईल याकरता हे सेंटर भुसावळ मधील लोणारी मंगल कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे आज पर्यंत या सेंटरमध्ये 124 रुग्णांची ट्रीटमेंट केली आहे त्यापैकी 30 रुग्ण हे सध्या या सेंटरमध्ये उपचार घेत आहेत व एका रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी परत असल्याची माहिती या सेंटरचे डॉक्टर निलेश महाजन यांनी दिली आहे