चाळीसगाव येथे ‘रुग्णाश्रम’ विलगीकरण कक्षाची स्थापना (व्हिडिओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी  । कोरोनाची लागण झालेल्या अनेक रूग्णांत लक्षणे दिसून येत नाही. अशावेळी घरात विलगीकरणास सोयीसुविधांच्या अभावामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा रुग्णांसाठी ‘रुग्णाश्रम’ येथे ५० घाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला  असून त्यात निःशुल्क सेवा देण्यात येणार आहे.

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील के. आर. कोतकर कॉलेज येथील मुलांच्या वसतिगृहात ५० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.  राष्ट्रीय विद्यालयाच्या सन २००२च्या बॅचच्या ११० मित्रांनी एकत्र येऊन सामाजिक भावना जोपासत ‘रुग्णाश्रम’ विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे.  या बॅचचे आमदार मंगेश चव्हाण देखील विद्यार्थी असून त्यांनी देखील कक्ष स्थापनेत पुढाकार घेतला आहे. हा कक्ष पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. कोरोनाची लागणं झालेल्या असंख्य रूग्णांत लक्षणे आढळून येत नाही. त्यात घरात सोयीसुविधेचा अभाव त्यामुळे संसर्गात वाढ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी शहरातील आर. कोतकर कॉलेज येथील मुलांच्या वसतिगृहात विलिनीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. उमेश पवार, तमाल देशमुख, सचिन आमले, खुशाल चव्हाण, चुडामण पाटील, मिलिंद पवार, डॉ. सुधीर देसले, धनंजय सोनवणे, विशाल सोनगिरे, उमेश महाजन व स्वप्निल राखुंडे यांच्या प्रयत्नातून हे सुसज्ज विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात दाखल होण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.  या अटी पुढील प्रमाणे : कोव्हिड चाचणीचा अहवाल, एचारसीटी स्कोअर हा ५ च्याखाली व ऑक्सिजन लेव्हल  ही  ९५ चा वर तसेच ७० वर्षा खालील व्यक्तीला कक्षात दाखल करता येणार आहे.  या कक्षात  ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने  कुठल्याही प्रकारचे उपचार करण्यात येणार नाही. रूग्णांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून मोफत जेवणाची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेता यावी यासाठी खालील संपर्क क्रमांकावर ७३९१०२६१८८, ९२२६७७१४७१, ९८३४६१८१३४, ८८३०४८३३६५, ९८२३३५५११८, ७५८८००७१८१८६६९०७३०८३, ९०२११३३७३७, ८८३०६४५२७६, ९८८१३३२६५६, ९९२२९०७२०७, ९६५७३१५७५७ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/340726044150467

 

Protected Content