Home अर्थ आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

0
35
online registration system for hospitals all you need to know
online registration system for hospitals all you need to know


जळगाव प्रतिनिधी । सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निम शासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने यांनी त्यांच्याकडील माहे ऑक्टोबर ते माहे डिसेंबर 2020 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र सादर/अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

या अनुषंगाने माहे ऑक्टोबर ते माहे डिसेंबर-2020 या कालावधीत आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील नियोक्ता या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. असे डॉ. रा. म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 


Protected Content

Play sound