एरंडोलच्या पोलिसाने घडवले माणुसकीचे दर्शन

95a11f5c 223b 4097 bc5c 88b0b4ec27cc

येथील रहिवासी पियुष कैलास परदेशी यांनी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एका वयोवृद्ध व्यक्तीस रेल्वे अपघातापासून वाचवून माणुसकीचे दर्शन घडवले. त्या व्यक्तीस औषध उपचार करून त्याची घरी जाण्याची व्यवस्था करून देवूनच ते स्वतः घरी जाण्यास निघाले.

 

सविस्तर वृत्त असे की, पियुष परदेशी आणि त्याचा मित्र अमोल कोल्हे हे दोघेही मलबार हिल पोलिस स्टेशनला पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत. पोलीस शिपाई पीयूष परदेशी (बक्कल नंबर ११/२००४) व पोलीस शिपाई अमोल कोल्हे (बक्कल नंबर ११/७२०) हे दोघेही निवडणूक काळात ४० तास अखंड कर्तव्य बजावून सोमवारी (दि.२९) च्या रात्री ११.३० वाजता आपली ड्युटी संपवून घरी जात असताना दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दादरहून मुंबईकडे जात असणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा अचानक पाय घसरून तो प्लॅटफॉर्मवर पडला. समोरचे दृश्य पाहून लगेच पियुष परदेशी व त्याचा मित्र अमोल कोल्हे यांनी त्यास प्लॅटफॉर्म पासून बाजूला केले व अपघात टाळला. तसेच त्या व्यक्तीस झालेली इजा बघून त्यावर औषध उपचार करून त्यास घरी जाण्याची व्यवस्था करून दिली, नंतरच स्वतः घरी जाण्यास निघाले.

पियुष हा एरंडोल येथील परदेशी गल्लीतील रहिवासी कैलास परदेशी यांचा सुपुत्र असून पियुष यास गरजू लोकांची मदत करण्याचा छंद आहे. पियुष याने आधी स्वतःचा वाढदिवस किंवा आपल्या परिवारातील वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम अनाथ किंवा गरीब लोकांसोबतच साजरा केलेला आहे. ही घटना एरंडोलकरांना कळल्यावर पियुष परदेशीचे सगळ्यांनी अभिनंदन केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात हि घटना माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

 

 

Add Comment

Protected Content