आमदार पाटलांच्या आवाहनास एरंडोलकरांचा प्रतिसाद : बुधवारी ठेवणार व्यवहार बंद

 

एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आमदार चिमणराव पाटील जनता कर्फ्यू पालनाचे आवाहन केले आहे त्यास प्रतिसाद देऊन बुधवारी १७ मार्च  रोजी शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

 आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बुधवारी १७ मार्च  रोजी शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. यापुढेही आठवड्यातील प्रत्येक बुधवारी एरंडोल शहर कोरोनाची स्थिती बदलण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवावे असे आवाहन नगर पालिका प्रशासन व व्यापारी संघटनांनी केले आहे.

 

Protected Content