एरंडोल, प्रतिनिधी । तालुका शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला म्हणून कर्नाटक सरकारचा व मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा निषेध करण्यात आला.
एरंडोल तालुका शिवसेनेकडून कर्नाटक सरकार व मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले म्हणून अर्णव गोस्वामी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरले म्हणून नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. जय भवानी जय शिवाजीचा नारा देत शिवसेना पदाधिकारीनी तहसील कार्यालय दणाणून सोडले व कारवाईची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी, पचांयत समिती सदस्य विवेक पाटील, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, आनंदा चौधरी, टोळीचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, हनुमंतखेडेचे किशोर पाटील, कासोदा युवा सेना उपशहर प्रमुख अमोल भोई, विभाग प्रमुख क्रुष्णा ओतारी, प्रणवराज पाटील यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.