एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुतन प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज करणार्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असुन आठ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि टाकरखेडा व बांभोरी भागातुन एकाच वेळी अवैध वाहतुक करणारे ८ ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण तथा धरणगावचे प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने आज दि.१८ मे रोजी सकाळी ६ वाजता आपल्या संपुर्ण टीम सोबत कारवाई करण्यासाठी निघाले व त्यात हिरामण शालिक सोनवणे यांचे ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ ३८६० मधील १ ब्रास अवैध वाळू,जितेंद्र परशुराम नन्नवरे एम.एच.१९ ९५०१ १ ब्रास वाळू,सतीष प्रकाश सपकाळे विना क्रमांक रिकामे,ज्ञानेश्वर भास्कर एम.एच.१९ ए.डी.६७६९ रिकामे,दिनेश भागवत नन्नवरे विना क्रमांक १ ब्रास वाळू,विलास रोहिदास कोळी विना क्रमांक रिकामे,राहुल सुधाकर कोळी विना क्रमांक १ ब्रास वाळू असलेली एकुण ८ ट्रॅक्टरवर कारवाई करत एकूण ४ ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत एरंडोल प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण,धरणगाव प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते,नायब तहसीलदार किशोर माळी,दिलीप पाटील,मंडळ अधिकारी मनोज शिंपी,लिपिक पंकज शिंदे,तलाठी सलमान तडवी,सुरेश कटारे,आरिफ शेख,राहुल देरंगे,कोतवाल मधु पाटील,पंकज भोई,नारायण सोनवणे यांनी केली. दरम्यान या कारवाईमुळे अवैध गौणखनिज माफियांमध्ये खळबळ उडाली असली तरी सदर कारवाईत सातत्य राहील का ? असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे.