पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात बिघाडी झाली असून तीन नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावल्यामुळे येथे बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे अमोल चिमणराव पाटील तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे येथे महायुती व महाविकास आघाडीत लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, या दोन्ही बाजूंनी बंडखोरी होणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागले आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. ते आज वा उद्या अर्ज भरू शकतात. यामुळे मविआमधील सुर बिघडल्याचे संकेत आहेत. तर महायुतीचे घटकपक्ष असणाऱ्या भाजपमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते डॉ. संभाजीराजे पाटील यांनी आधीच आपण अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. परिणामी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंना बंडखोरीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात, यामुळे येथील राजकीय लढत ही अधिक रंगतदार झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
एरंडोल-पारोळ्यात रंगणार राजकीय दंगल : अपक्षांमुळे येणार रंगत !
2 months ago
No Comments