एरंडोल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ व ८ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार वेग आला आहे. आज महायुतीतर्फे भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीत कार्यसम्राट आमदार दादासाहेब अमोल पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून जनतेशी संवाद साधत उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान त्यांनी माय-बाप मतदारांचे आशिर्वाद घेत पुढील विकासकामांची हमी दिली.
प्रचार रॅलीला जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख व प्रभाग क्र. ५ ‘ब’ चे उमेदवार प्रा. मनोज पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, एस.आर. बापू पाटील, खडके येथील जगदीश पाटील, भैय्या गुजर, आबासाहेब ठाकुर आदी मान्यवरांनी उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. याशिवाय विविध समाजातील मान्यवर, स्थानिक नेते, नागरिकांनी रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला.

पाटील समाजाचे अध्यक्ष मंगेश पाटील, संतोष ठाकुर, सुभाष मराठे, नारायण ठाकुर, प्रकाश ठाकुर, ज्ञानेश्वर मराठे, जगदीश जगताप, पंडित पाटील, नामदेव पाटील, सुभाष मराठे, आकाश ठाकुर, पिंटू मावळे, भैय्या पाटील, सोनू ठाकुर, हरी ठाकुर, शहरप्रमुख बबलुदादा चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांनी रॅलीदरम्यान नागरिकांना विकासाचा रोडमॅप मांडत आगामी नगरपरिषदेसाठी स्थिर व सक्षम नेतृत्व देण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रभाग क्र. ५ ‘अ’ च्या उमेदवार सत्यभामाबाई माधवराव पाटील, प्रभाग ८ ‘अ’ च्या उमेदवार भारती मनोज गुर्जर आणि प्रभाग ८ ‘ब’ च्या उमेदवार पौर्णिमा महेश देवरे यांनीही घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची गती वाढवली आहे.
प्रचार रॅलीदरम्यान महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, निवडणुकीत यंदा प्रभाग ५ आणि ८ मध्ये महायुतीची लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.



