Home Cities एरंडोल चाकूच्या धाकाने जवानाला लुटले : गुन्हा दाखल

चाकूच्या धाकाने जवानाला लुटले : गुन्हा दाखल

0
36
FIR

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील भालगाव फाट्याजवळ जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले जवान श्रीकांत शांताराम माळी (रा.सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी येत होते. १८ रोजी रात्री ते रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने ते मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले . एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे चालकाने तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर चालकासह त्याच्या सोबतच्या दोघांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावून घेतली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयित पारोळ्याकडे पसार झाले.

या संदर्भात जवान श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिस स्थानकात तिघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे करत आहेत.


Protected Content

Play sound