Home Cities एरंडोल गिरणा नदीत बुडून तरूणाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून तरूणाचा मृत्यू

0
57


एरंडोल प्रतिनिधी | गिरणा नदीपात्रात बुडून तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, दापोरी गावाजवळील शेताजवळ गिरणा नदीच्या काठाजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रवंजे बुद्रुक येथील तान्हु उर्फ आबा कौतिक सोनवणे (वय ३६) या युवकाचा मृतदेह आढळून आला.

याबाबत कुंदन सखाराम कोळी यांनी पोलिस पाटील सखाराम तान्हू सोनवणे यांना माहिती दिली. तर रवंजे येथील दशरथ ओंकार कोळी, उमाकांत महारु कोळी यांनी मृतदेह बाहेर काढला. याबाबत सोनवणे यांच्या माहितीवरून एरंडोल पोलिसात नोंद केली आहे.


Protected Content

Play sound