Home Cities भडगाव भडगावातील ‘त्या’ मतदान केंद्रावर पुनर्मतदानास प्रारंभ

भडगावातील ‘त्या’ मतदान केंद्रावर पुनर्मतदानास प्रारंभ

0
43

भडगाव प्रतिनिधी । येथील बुथ क्रमांक १०७ वर आज सकाळी सात वाजेपासून पुनर्मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे.

२३ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मतदान क्लिअर न करता मतदान प्रक्रिया पार पाडली. शिवाय तीन मतदान जास्तीचे आढळून आले. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया रद्द करून केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जात आहे. या अनुषंगाने बुथ क्रमांक १०७ वरील १३८२ मतदार लोकसभेसाठी दुसर्‍यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. आज सकाळी ७ वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, आज तरी येथे सुरळीतपणे मतदान घ्यावे यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound