शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला ; आमदारांसह ४४ जणांना अटक

Shivaji maharaj

 

जालना (वृत्तसंस्था) अंबड शहरातील जालना रोडवरील पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर आज पहाटे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसविण्यात आला. या प्रकरणी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसविण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला. त्यामुळे कुचे यांच्यासह ४४ जणांना ताब्यात घेतले. अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकांची खूप दिवसांची ही मागणी होती. ती आज आम्ही पूर्ण केली,’ अशी प्रतिक्रिया कुचे यांनी दिली आहे.

Protected Content