राष्ट्रवादी अजित पवार गटात महिला पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील डॉ.संभाजीराजे आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जळगांव शहर महानगर कार्याध्यक्ष लता मोरे, चाळीसगांव महिला आघाडी उपाध्यक्ष सोनाली देवळकर, एरंडोल महिला तालुकाध्यक्षा जयश्री पाटील, डॉ. क्रांती संभाजीराजे पाटील, पारोळा महिला तालुका अध्यक्ष मिनाक्षी भोसले यांच्या उपस्थित सर्व नवनिर्वाचीत महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

त्यात पारोळा तालुका उपाध्यक्ष पदी योगिता भैय्यासाहेब शिंदे, पारोळा महिला शहर अध्यक्षपदी दिपाली किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पारोळा व ग्रामीण भागातील इतर महिला भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास संपादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिला भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत-सत्कार केला.

Protected Content