Home Cities पाचोरा पाचोऱ्यातील उद्योजक व कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, पक्षाला बळ !

पाचोऱ्यातील उद्योजक व कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, पक्षाला बळ !

0
199

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पंपिंग रोड परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथील प्रसिद्ध उद्योजक भुवनेश दुसाने, निलेश मराठे, हेमंत चौधरी आणि भरत भैरु यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

राजकीय पाऊल नाही, वैचारिक एकात्मता
यावेळी बोलताना भुवनेश दुसाने म्हणाले की, हा केवळ राजकीय प्रवेश नसून, वैचारिक एकात्मतेचा भव्य क्षण आहे. त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या स्मार्ट सिटी व्हिजन आणि जनकल्याण लढाईचे कौतुक केले. पंपिंग रोड परिसराला नवे रंग, स्वप्न आणि यश मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे पंपिंग रोड परिसरातील नागरिकांमध्ये विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाची प्रशंसा
स्थानिक नागरिकांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, गटारी आणि सुशोभीकरणाच्या कामांना गती मिळाली आहे. या कामांमुळे पंपिंग रोड विकासाचा महामार्ग बनेल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या प्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर आणि शहरप्रमुख सुमित सावंत यांचीही उपस्थिती होती. हा प्रवेश शिवसेनेच्या पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound