यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर विद्यालयातील १९९८ ते ९९ वर्षातील १० वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
खुप वर्षापासून या शाळकरी मित्रांच्या भेटी साठी सर्व जण आतुर झाले होते,आज तब्बल २२ वर्षांनी सर्व पुन्हा शाळेच्या आवारात जमले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आपल्या शालेय जिवनाच्या काळातील गप्पा गोष्ठीनी अनेकांचे आंनदाच्या अश्रुनी डोळे ही पाणावले. या कार्यक्रमासाठी काही शिक्षक गुरुजन वर्गांनी आवर्जून उपस्थिती दिली. सर्व शिक्षक आणि शाळेला सर्वांनी मिळून भेट वस्तू दिली व सर्वांचे स्वागत केले.
सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला आणि शैक्षणिक जिवनानंतर आता ते कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे व काय करतात ते आपल्या शालेय मित्रांना भेटुन सांगितले,काही जणांनी खरच आपल्या जिवनात खूप उत्तुंग भरारी घेतली आहे.
सामाजिक,राजकीय,देशसेवा, शैक्षणिक सर्वच,व्यवसाय,नोकरी क्षेत्रात आज हे विद्यार्थी कार्यरत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आज नवीन उपक्रम सुरू केला, सर्वांनी आपल्या कमाई मधून इच्छेनुसार शाळेला आर्थिक मदत केली व आपल्या शाळेतील आर्थिकदष्टया,आपत्कालीन आर्थिक गरज असे जे वर्गमित्र असतील त्यांना ती रक्कम द्यायची.., याचा शुभारंभ आज केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे वर्गणी म्हणुन जमा केले आणि गरजू मैत्रिणीला ते दिले.
सर्वांनी आज पुन्हा २२ वर्ष मागे जाऊन मनसोक्त या दिवसाचा आनंद लुटला या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आपल्या शाळेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या उत्कृष्ठरित्या माजी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम बद्दल शाळेतील शिक्षक गुरूजनांचे खुप आभार मानले आणी येणाऱ्या भविष्य काळात ही परंपरा कायम राखुन नेहमी असे कार्यक्रमाचे नियोजन करायचे ठराविण्यात आले .