Home Cities जामनेर पहूरला फुले विद्यालयात ‘इंग्लिश डे’ ; चेस प्रकल्पामुळे विदयार्थी इंग्रजी बोलू लागले

पहूरला फुले विद्यालयात ‘इंग्लिश डे’ ; चेस प्रकल्पामुळे विदयार्थी इंग्रजी बोलू लागले


9560d16c 2d2f 463c a1ca 8692b13983f8
 

पहूर, ता . जामनेर (प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शनिवारी ‘इंग्लिश डे’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका व्ही .व्ही. घोंगडे या होत्या. वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे इंग्रजीतून संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

 

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात प्रादेशिक विदया प्राधिकरण औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शाळांमध्ये चेस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेद्दल आत्मविश्वास वाढत आहे. दर शनिवारी इंग्रजी दिवस साजरा केल्याने मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी बोलू लागले आहेत.

आज ( ता. ७ ) झालेल्या कार्यक्रमात श्वेता सोनवणे, अमृता सोनवणे, प्रेरणा भोंडे, आर्शिया शेख, पल्लवी घाटे, प्रथमेश लहासे, वेदांत क्षीरसागर, देवेश सोनवणे , कुश उभाळे, पवन बावस्कर , भुषण मगरे, सौरभ द्राक्षे, प्रथमेश क्षीरसागर , आकांक्षा जाथव , दिक्षा खरे , अनिकेत जाथव , जीवन बनकर आदी विद्यार्थ्यांनी गोष्ट , सुविचार, दिनविशेष, प्रेरणा गीत , स्वागत गीत , शब्दांची जादू, संभाषण , मुलाखत आदी उपक्रम सादर केले .

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .व्ही. घोंगडे विदयार्थ्यांचे कौतूक केले . त्यांचे आर .जे. चौधरी यांनी स्वागत केले ,बी.एन जाधव , एच .बी. राऊत यांनी मार्गदर्शन केले . यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख शंकर भामेरे यांचा राज्यस्तरीय चेस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला . सुत्रसंचालन पियुष मगरे याने केले तर प्रथमेश लहासे याने आभार मानले . यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी , विदयार्थ्यांचे सहकार्य लाभले .


Protected Content

Play sound