कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्करात असलेल्या सुट्टीवर आलेल्या एका जवानाने तिघांच्या मदतीने गावातील एका तरुणाची लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या आई समोरच त्यांची हत्या केली. ही घटना रविवारी १९ मे रोजी घडली आहे. विकास आनंदा पाटील असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. जवान युवराज शिवाजी गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. आरोपी लष्करी जवानासह त्याचे तीन साथीदार फरार झाले आहे. या सर्वांवर पन्हाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, विकास व युवराज यांच्यामध्ये काही कारणावरून वाद सुरू होते. युवराज हा भारतीय सैन्य दलामध्ये आहे. तो फेब्रुवारीमध्ये सुट्टीवर गावात आला होता. यावेळी विकास आणि युवराज यांच्यात मोठे वाद झाले होते. हा वाद झाल्यावर युवराज हा पुन्हा त्याच्या कर्तव्यावर निघून गेला होता. दरम्यान, युवराज हा पुन्हा शनिवारी सुट्टीवर गावात आला होता. मात्र, त्याने तीन मित्रांच्या मदतीने विकास आणि त्याची आई दुचाकीवरून दूध घेऊन शेतातून घरी जात असताना चार जणांनी विकासची दुचाकी अडवली. यावेळी त्यांच्या तोंडला मास्क लागलेला होता. या सर्वांनी विकासला विकसला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात विकासच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याच्या आईंने आरडा आरोडा केला. आरोपींनी त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विकासला दवाखान्यात भरती करण्यात आले येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले असता, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला आहे. विकासच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. हा वाद कोणत्या कारणावरून झाला हे समजून शकलेले नाही आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.