बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे संपविलं आयुष्य

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील ४९ वर्षीय प्रौढ व्यक्तीने बेरोजगारी आणि कर्जबाराला कंटाळून राहत्या घरात आपल जीवन यात्रा संपविली. ही घटना रविवारी १२ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लीलाधर कौतिक पाटील (वय-४९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात लिलाधर पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेती आणि मोलमजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून लिलाधर यांच्या हाताला काम नव्हते, तसेच त्यानी खासगी कर्ज देखील काढले होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. रविवारी १२ जानेवारी रोजी त्यांची पत्नी सविता ह्या गावी गेलेल्या होत्या तर ११ वर्षीय मुलगा चेतन हा बाहेर गेलेला होता. त्यावेळी लिलाधर पाटील घरात एकटे होते. त्यामुळे त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी साडेचार वाजता त्यांचा मुलगा चेतन हा घरत आला तेव्हा वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आक्रोश करत आक्रोश करीत घराच्या शेजारी राहणाऱ्या काकांकडे आला व घटना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गफुर तडवी हे करीत आहे. त्यांच्या पश्चात आई निर्मला, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी सविता, मुलगा चेतन आणि मुलगी प्रांजल असा परिवार आहे.

Protected Content