जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घर न्यायालयाच्या आदेशाने बँकेने सीलबंद केले होते. दरम्यान, घराचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या दाम्पत्याविरोधात मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शहरातील उज्जीवन स्मॉल फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार नांद्रा बु. येथील घरावर १९ सप्टेंबर २०२४ रोजी जप्तीची कारवाई करुन ते सीलबंद केले होते. परंतु १८ फेब्रुवारी रेाजी मनोज भास्कर पाटील व वैशाली भास्कर पाटील (दोन्ही राहणार नांद्रा बु. ता. जळगाव) या दोघांनी सीलबंद केलेल्या घराचे सील तोडून विनापरवानगी बेकायदेशीररित्या वास्तव्य करतांना मिळून आले. त्यानुसार संबंधित फायनान्स कंपनीतील कर्मचारी शोएब इकबाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दोघांविरुद्ध गृह अतिक्रमण केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहे.