Home Cities अमळनेर अमळनेरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा पुतळा जाळला

अमळनेरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा पुतळा जाळला


IMG 20190301 WA0050

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अधिवेशन 2019 च्या बजेटमधे पाडळसरे धरणाला तुटपुंजा निधी देण्यात आला आहे. यानिमित्ताने अंमळनेर तालुक्याच्या जनतेवर अन्याय झाला असल्याचा आरोप करीत आज राष्ट्रवादीच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा पुतळा जाळण्यात आला.

 

स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाडळसरे धरणाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते. दुसरीकडे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाडळसरे आंदोलन समितीचा मोर्च्यादरम्यान, भ्रमणध्वनीद्वारे पाडळसरे प्रकल्पाला 2300 कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देतो आणि धरणाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. परंतु अर्थसंकल्पात मात्र, त्यांची घोषणा फोल ठरल्या व जनतेचे धरण होईल आशा मावळल्या. या गोष्टीचा संताप व्यक्त करण्यासाठी आज स्थानिक दोन्ही निष्क्रिय आमदारांचा निषेध करण्यासाठी व जलसंपदामंत्री जाहीर निषेध करून पुतळा जाळण्यात आला. दुसरीकडे पाडळसरे हक्क समितीतर्फे उद्या जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी तिलोत्तमा पाटील, शिवाजी रावदास,तालुका अध्यक्ष सचिन पाटील, विधान क्षेत्रप्रमुख भागवत पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, संजय पूनाजी, प.स प्रवीण पाटील,निवृत्ती बागुल, योजना पाटील,आशाताई चावरीया ,अलका पवार,हिम्मत पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, हर्षल पाटील, गौरव पाटील, गुलाब पिंजारी ,अबिद मिस्तरी ,सुभाष बापू, रणजीत पाटील, निलेश देशमुख, अरुण पाटील, इमरान खाटीक, सुनील शिंपी, कर्तारसिंग, राहुल गोत्राळ,नरेंद्र पाटील, संभाजी पाटील, वसीम पठान, बाळा शेख ,सोनू पाटील,संभाजी पाटील,महेश पाटील,सुनील पाटील,गजेंद्र पाटील,संजय पाटील,श्याम पाटील,सनी गायकवाड़ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound