चोपडा/अडावद प्रतिनिधी । येथील प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थीनी एमनतशा एजाजोद्दीनला सायबर ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक मिळाले असून यानिमित्त तिचा शाळेत सत्कार करण्यात आला.
चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिर चोपडा गावातील विभाग इथे इयत्ता सहावीत असलेली एमनतशा ला सायबर ओलंपियाड मध्ये गोल्ड मेडल मिळाले. सायबर ओलंपियाड ही परीक्षा सायन्स ओलंपियाड फौंडेशन दिल्ली या संस्थेमार्फत घेतली जाते, ही परीक्षा संगणकाशी संबंधित आहे. या विद्यार्थिनीने सर्वात जास्त गुण मिळवून या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. एमनतशा ही प्रताप विद्या मंदीराचे उपशिक्षक एजाज शेख यांची कन्या तर अडावद येथील माजी सरपंच हाजी कबिरोद्दीन यांची नात आहे. या यशाबद्दल तिचे प्रताप विद्यामंदिर चे मुख्याध्यापक याज्ञिक सर, उपमुख्याध्यापक डी. के. महाजन, पर्यवेक्षक जी. वाय. वाणी, वाय. एस. चौधरी व मार्गदर्शक प्रीति गुजराथी यांनी कौतुक केले आहे.