ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी जळगावात एल्गार मेळावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येणाऱ्या २२ मार्च २०२५ रोजी भारतीय समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी जळगाव येथील मानराज पार्क येथे महत्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समता परिषदचे यावल तालुका अध्यक्ष नितिन सोनार यांनी या मेळाव्यास ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री शेतकी संघ येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने ओबीसी बांधवांसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या बैठकीत येणाऱ्या २२ मार्च रोजी ओबीसी एल्गार मेळावा महाराष्ट्राचे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मेळाव्याला अधिकाधिक ओबीसी समाज बांधव उपस्थित राहावे यासाठी विविध नियोजनावर चर्चा करण्यात आली.

मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे. या बैठकीत उपस्थित समाजबांधवांनी एकजूट दाखवत, सर्वसामान्यांना सोबत घेऊन मोर्चाला उपस्थित राहण्याचे निर्धार व्यक्त केला.

बैठकीस समता परिषदचे यावल तालुकाध्यक्ष नितीन सोनार, चेतन आढळकर, किशोर माळी, डॉ. निलेश गडे, श्रीराम बडगुजर, अतुल बडगुजर, मनोज करणकर, ज्ञानेश्वर देशमुख, महेश गडे, सुधाकर धनगर, संजय फिरके, सुनील वारुळे, नरेंद्र शिंदे, योगेश वाणी, अनिल चौधरी, जयवंत माळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी चेतन आढळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content