जळगाव प्रतिनिधी । अद्ययावत दृक-श्राव्य साधनांचा वापर करुन स्वत:ची प्रभावी शौक्षणिक इलेक्ट्रॉनिक साधने शिक्षकांनी विकसित करावी, असे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित डेव्हलपमेंट ऑफ इ-कन्टेट फॉर इफेक्टीव्ह टिचींग अॅण्ड लर्निंग या विषयावरील व्दि-दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन करतांना केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रेात केंद्र आणि रा.शि.प्रस.मं.चे व्ही.एन.नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरु पी.पी.माहुलीकर, रावेर शिक्षण प्रसारक मंळळाचे चेअरमन एच.डी. नाईक, प्राचार्य पी.व्ही.दलाल, प्रा.अनिल पाटील, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनिल चिकाटे हे होते.
यावेळी प्रा.माहुलीकर बोलत होते. ते म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षकांना प्रभावी इ-शौक्षणिक साधने तयार करण्यासाठी अर्थसहाय्याकरीता योजना सुरु केली आहे. त्याचा लाभ घ्यावा. विविध संकेतस्थळे व साधनांव्दारे माहिती प्राप्त करुन घेऊन शिक्षकांनी स्वत:ची साधने विकसित करुन विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे. इ-साधनांचा सर्वच विद्याशाखेत प्रभावी उपयोग करता येऊ शकतो असेही ते म्हणाले. यावेळी प्रा.माहुलीकर यांच्या हस्ते व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक मिडीया रिसर्च सेंटर चे ऑन लाईन उदघाटन केले. प्राचार्य पी.व्ही.दलाल यांनी कार्यशाळेची रुपरेषा व महाविद्यालयातील ई-सुविधांची माहिती दिली. रावेर महाविद्यालयाचे प्रा. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ.अनिल चिकाटे यांनी आभार मानले. प्रा.रमेश सरदार यांनी सूत्रसंचालन केले. उदघाटन सत्रांनंतर पुणे येथील नॉलेज ब्रीज संस्थेचे भूषण कुळकर्णी आणि एकनाथ कोरे यांनी ई-कन्टेंट अॅण्ड ऑडीयो-व्हिडीयो प्रेझेंटेशन वर्कशॉप या विषयावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण 166 शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे.