२१ कामचुकार बीएलओंना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बजावली नोटीस

election

जळगाव, प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बीएलओंना दिलेल्या मुदतीच्या आत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे काम देण्यात आले होते. ते न केल्याने २१ बीएलओंना आज (दि.16) रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपमाला चौरे यांनी दिली.

जिल्हयातील अकरा विधानसभा मतदार संघात २१ आक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया होत असून अजुनही विहित मूदतीत मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले नसल्याचे मतदारांनी सांगीतले. यात बीएलओ क्रमांक १ ते ७ व २८३ ते २९६ असे २१ बीएलओंनी निवडणूक कामात कुचराई केली असल्याचे आढळून आले आहे. तसेच स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता संबधित बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले.

मतदारांना वोटर स्लिप घेण्यासाठी घरी बोलावले जाते किंवा वेळेत दिल्या जात नाहित यावरून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदेश गांभीर्याने न घेता दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच यापूर्वी देखिल तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने आपणाविरूद्ध कारवाई का करू नये या संदर्भात २४ तासाचे आत खुलासा करावा असे जळगाव शहर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी चौरे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Protected Content