Home राजकीय साध्वीला निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वीला निवडणूक आयोगाची नोटीस

0
27

images 11
भोपाळ वृत्तसंस्था । शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग यांना आज निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाल्यानंतर त्यांनी याबाबत माफी मागितली. मात्र यावरून आता भोपाळचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी साध्वीला नोटीस बजावली आहे. या संदर्भात माहिती देतांना ते म्हणाले की, याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. शिवाय संबंधित कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला याक्षणी नोटीस बजावण्यात येत असून २४ तासांत त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. दरम्यान, साध्वींच्या या विधानावर देशभरातून चौफेर टीका केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound