निवडणूक आयोगाकडून जिल्हयातील दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन निरीक्षक नियुक्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून डॉ. राहुल गुप्ता (आय.ए.एस ), दुसरे मतमोजणी निरीक्षक सीमाकुमार उदयपुरी ( एस. सी. एस ) असणार आहेत.

मतमोजणी संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आयुष प्रसाद – ८२७५९७०६७२ या क्रमांकावर संपर्क किंवा उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर – ७९७२७०४०७९ या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करता येईल.

रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून पुस्पांजली दास ( आय.ए. एस ), दुसरे मतमोजणी निरीक्षक – महेंदर पाल ( आय.ए.एस ) असणार आहेत. रावेर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे किंवा ९४२१३२३३६६ उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर – ७९७२७०४०७९ यांच्या या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करू येईल.

जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या चारही निरीक्षकांचे आगमन झालेले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांचे माहितीकरिता मतमोजणी निरीक्षक यांना केवळ लोकसभा निवडणूक मतमोजणी संदर्भात संपर्क साधण्यासाठी दिनांक ३ जून, २०२४ पासून दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत या वेळेत कार्यालयीन पत्त्यावर ‘राजगड’ अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे संपर्क करू शकता, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद आतुर्लीकर यांनी कळविले आहे.

Protected Content