दागिन्यांसाठी वृध्द आईला मुलाकडून बेदम मारहाण

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यात एक घटना समोर आली आहे. नातीच्या लग्नात सोन्याचे दागिने दिले नाही म्हणून पोटच्या मुलाकडून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात मुलासह एकावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विमल पंढरी कोळी वय ७५ रा. सुरवाडा या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच गावात त्यांचा मुलगा भगवान पंढरी कोळी हा राहतो. त्याच्या मुलीचे लग्न असल्याने भगवान कोळी याने आई विमल कोळी यांच्याकडे कानातील बाही आणि मंगळसुत्र मागितले. त्यावर विमल कोळी यांनी दागिने देण्यास नकार दिला. या कारणावरून मुलगा भगवान पंढरी कोळी आणि बेबाबाई भगवान कोळी दोन्ही रा. सुरवाडा यांनी वृध्देला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात वृध्द महिलेने धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद श्रीनाथ हे करीत आहे.

Protected Content