जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मुकुंद नगर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐकून 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आले आहे. या संदर्भात रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण लक्ष्मण शेटे वय 64 रा. मुकुंदनगर जळगाव हे वृद्ध आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान 27 जून ते 11 जुलै या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर अरुण शेटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून दिली. त्यानुसार रात्री 11 वाजता आज्ञा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.




