Home क्राईम धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्द जागीच ठार !

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्द जागीच ठार !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे रूळावर अनोळखी वृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याबाबत दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव ते भादली रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक (४२४) वरील १८ ते २० च्या दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनीवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. दरम्यान यासंदर्भात लोका पायटल सचिन पवार यांनी जळगाव स्टेशन मास्तर यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून घटनेची पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत हे करीत आहे.


Protected Content

Play sound