अपघातात जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आर.एल.चौफुली येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृध्दाचा बुधवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता उपचारदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. याबाबत सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी असलेले विनायक काशिनाथ शिंपी वय ६५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान ९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसीतील आर.एल. चौफुली झालेल्या अपघातात विनायक शिंपी हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ भगवान चौधरी हे करीत आहे.