एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत तोल जावून पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत दुपारी ३ वाजता कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नारायण धोंडू सातपुते वय ६४ रा. आडगाव ता. एरंडोल असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण सातपुते हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ते गावात फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचे सांगून ते घरातून निघून गेले होते. दरम्यान, गावातील मराठी शाळेच्या बाजूला ग्रामपंचायतच्या वहिरीच्या कठड्यावर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने ते विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेवून त्यांना विहिरीतून बाहेर काढले आणि एरंडोल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




