जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात राहणारे ७२ वर्षीय वयोवृध्द लाकूड तोडतांना चक्कर येवून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाला. ही घटना अयोध्यानगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर असे की, साहेबराव तोताराम पाटील (वय-७२) रा. एमआयडीसी परिसर हे वयोवृध्द व्यक्ती आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. आज बुधवारी २६ मे रोजी सकाळी सरपणासाठी लागणारे लाकूड तोडण्यासाठी अयोध्यानगरात आले होतो. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते लाकूड तोडत असतांना त्यांना चक्कर आल्याने जे जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.