Home क्राईम जिन्यातून पाय घसरून पडल्याने वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जिन्यातून पाय घसरून पडल्याने वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील जिन्याच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दांडेकर नगर येथील वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनीवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश दिलवर वाल्मिकी वय ६२ रा. दांडेकर नगर जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दांडेकर नगर येथे मुकेश वाल्मिकी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ते घरातील जिन्याच्या पायऱ्यावरून तोलवून घसरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव खासगी रूग्णालयात दाखल करून उपचार केले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्याना छत्रपती संभाजी नगर येथील घाटी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound