जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या रेल्वे अपघातात विठ्ठल शाम बाविस्कर (वय ६५, रा. वाकडी, ता. जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या बाबत शनिवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे विठ्ठल बाविस्कर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. शनिवारी १३ डिसेंबर रोजी त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर मयताचे नातेवाईक गोकुळ रघुनाथ सोनवणे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांनी विठ्ठल बाविस्कर यांना मृत अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर माहिती घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजयसिंग पाटील हे करत आहेत.




