Home क्राईम शेतीच्या वादातून वृध्दाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

शेतीच्या वादातून वृध्दाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीच्या वादातून एका वृध्दाला पाचोरा येथील रेल्वे स्थानक परिसरात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी २२ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर भिवसन माळी वय ६० रा. देशमुख वाडी, पाचोरा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतीच्या वादातून बुधवारी २१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता प्रविण मुधकर महाजन, प्रथमेश राजेंद्र महाजन, राजेंद्र मधुकर महाजन, चेतन प्रविण महाजन सर्व रा. श्रीरामचौक पाचोरा यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसचे त्यांच्या दुकानातून ४ हजार रूपयांची रोकड चोरू नेली. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून ईश्वर माळी यांचे भाऊ वासुदेव माळी यांना देखील मारहाण केली. याप्रकरणी ईश्वर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे प्रविण मुधकर महाजन, प्रथमेश राजेंद्र महाजन, राजेंद्र मधुकर महाजन, चेतन प्रविण महाजन सर्व रा. श्रीराम चौक पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound