Home क्राईम बकऱ्या चारण्यावरून वृध्दाला शिवीगाळ करत मारहाण

बकऱ्या चारण्यावरून वृध्दाला शिवीगाळ करत मारहाण

0
186

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी गावात शेतात बकरी शिरल्याच्या कारणावरून एका ७४ वर्षीय वृद्धावर तीन जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली असून, याप्रकरणी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण बुधव परदेशी (वय ७४) यांच्या शेतात गावातीलच काही लोकांच्या बकऱ्या शिरल्या. याच कारणावरून त्यांना गावातीलच लक्ष्मण रामदास परदेशी, बादल लक्ष्मण परदेशी आणि आकाश लक्ष्मण परदेशी यांनी रविवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने लक्ष्मण परदेशी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर जखमी लक्ष्मण परदेशी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रवींद्र तायडे हे करत आहेत. या घटनेमुळे कंडारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound