ज्येष्ठ, दिव्यांग, असहाय मतदारांना विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली मदत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मतदान केंद्रात मतदान करण्याचे कर्तव्य सोयीस्कर व्हावे, यासाठी मेहरुण येथे विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकत्यांनी मदतीचा हात दिला. थेट मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याबरोबरच, त्यांचे नाव शोधून देणे, त्यांचा क्रमांक काढुन त्यांच्या हातात देणे, अशी मदत त्यांनी केली. यामुळे ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मोठा दिलासा मिळाला.

मेहरुण परिसरात रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक परिसरात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रावर जावून वृध्द व दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी मदत केली. यासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख,संकेत म्हस्कर,अक्षय गवई,मनिष चौधरी,निखिल शेलार ,राहुल पाटिल,चेतन राजपूत,मयुर डांगे,ऋषीकेश पवार,देव कळसकर,वीर चौधरी, पवन चौधरी,विकी राजपूत,सागर कोष्टी, सोमश रामटेके, हर्षल सावकारे,हर्षल कोष्टी, पंकज पाटिल,कैलास पाटिल,अजय मांडोळे,दीपेश कदम,लोकेश निकम,दीपक मराठे आदिनी परिश्रम घेतले.

Protected Content