एकता ॲटो युनियनचे पाचोरा तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरु

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकता ऑर्ट रिक्षा चालक-मालक युनियनच्या माध्यमातून आपल्या कार्यालयास वेळोवेळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांच्या विरुध्द कारवाई करण्या संदर्भात निवेदने दिलेली आहेत. तरी सुध्दा या विना परवाना प्रवासी चाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी होतांना दिसत नाही उलट त्या वाहनांनी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा विनापरवाना वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी एकता अॅटो युनियनच्या वतीने पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण बसले आहे.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ सदनशिव, उपाध्यक्ष सुधाकर महाजन, सचिव नाना चौधरी, सहसचिव अनिल लोंढे, खजिनदार अशोक निंबाळकर, सह खजिनदार गणेश पाटील यांचेसह मोठ्या संख्येने एकता अॅटो रिक्षा चालक मालक युनियनचे पदाधिकारी व सदस्य पाचोरा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा व इतर वाहनांच्या अवैध रितीने ऑटो रिक्षांचा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर व त्यांच्या कुटुंबावर प्रत्यक्षपणे उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण आमच्या गाड्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन घेतलेल्या आहेत. तर हया फायनान्स कंपनीचे हप्ते फेड व कुटुंबाचे पालन पोषण तसेच त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, म्हातारे आई-वडील सांभाळणे यामुळे या सर्व गोष्टी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे सुरु असलेले अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक चेसेस नंबर कट करून ऑटो रिक्षा व्यवसाय करीत आहेत. पाचोरा शहरात व परिसरात चेसेस पत्रा कापून व परवाना संपलेला असतांना सर्रास व्यवसाय करणाऱ्या ऑटो रिक्षा बंद झाल्याच पाहिजे, ग्रामीण भाग असल्यामुळे गाडी पासिंग करतांना मिटरची सक्ती नसावी. या मागण्यासाठी २६ पासुन एकता ऑटो रिक्षा चालक-मालक युनियनतर्फे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड, गटशिक्षण आधिकारी विश्वनाथ धनके यांच्यासह यावल कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय प्रार्चाया संध्या सोनवणे, साने गुरूजी महाविद्यालय यावल,मुलींची माध्यमीक कन्या शाळा यावल यांना निवेदन दिले आहे. पुढील एक महिन्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाने विद्यार्थीनी सुरक्षा संदर्भात काय उपाय योजना आखली याची पाहणी करणार असुन , दरम्यान ज्या शाळा प्रशासनाने उपाययोजना केलेली नसल्याचे आढळून आल्यास आपण त्या शाळा प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवt निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर चेतन अढळकर, शाम पवार, किशोर नन्नवरे, गौरव कोळी व मुकेश बोरसे यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content