मुंबई-वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन मगच आपला प्रचार सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अडीच वर्षांपूव एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. यामुळे ठाकरे गट सातत्याने गुवाहाटीचा उल्लेख करत शिंदे गटावर टिका करत असतो. या पार्श्वभूमिवर आता एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याचे समजते.
गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात एकनाथ शिंदे हे देवीचे दर्शन घेणार असून नंतर मग ते आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.